आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (IFAD) इंटर्नशिप २०२५

2025-02-20

आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (IFAD) इंटर्नशिप २०२५

आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (IFAD) इंटर्नशिप २०२५ हा ६ महिन्यांचा सशुल्क कार्यक्रम आहे, जो विद्यार्थ्यांना आणि नवोदित पदवीधरांना कृषी आणि अन्न सुरक्षेशी संबंधित व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याची संधी देतो.

कार्यक्रमाचा लाभ

दरमहा वाढीव स्टायपेंड मिळेल, जो राहण्याच्या खर्चासाठी उपयोगी ठरू शकतो.

रोम (इटली) किंवा अन्य अधिकृत ठिकाणी निवास व्यवस्थेसाठी मदत मिळू शकते.

• प्रवास खर्चासाठीही आर्थिक सहाय्य मिळण्याची शक्यता.

संयुक्त राष्ट्राच्या कृषी संस्थेमध्ये काम करण्याची संधी.

जागतिक कृषी आणि अन्न धोरणांबद्दल थेट अनुभव मिळेल.

पात्रता निकष

संबंधित क्षेत्रातील पदवी घेत असलेले विद्यार्थी किंवा अलीकडे पदवी प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

विद्यार्थ्यांनी मागील २४ महिन्यांत विद्यापीठात अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा आणि किमान २ वर्षे पदवी शिक्षण पूर्ण केलेले असावे.

उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

इंग्रजी भाषा अवगत असणे आवश्यकः IFAD च्या इतर अधिकृत भाषांचे ज्ञान असल्यास प्राधान्य दिले जाईल.

यामुळे तुमच्या योगदानाची दखल या संस्थांकडून IFAD च्या देशीय कार्यालयांमध्ये काम करण्यासाठी त्या देशाच्या स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक असू शकते.

युरोपमध्ये सशुल्क आंतरराष्ट्रीय कृषी इंटर्नशिप शोधत असाल, तर IFAD Enhanced Internship २०२५ तुमच्यासाठी उत्तम संधी आहे!

निवड निकष

इंटर्नशिपची निवड खालील बाबींवर आधारित केली जातेः

शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी: IFAD च्या फोकस क्षेत्रांशी संबंधित शैक्षणिक आणि व्यावसायिक अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाते.

भाषिक कौशल्येः अनेक भाषांमध्ये, विशेषतः IFAD च्या अधिकृत भाषांमध्ये प्रवीणता हा एक फायदा आहे.

विकास कार्याची आवडः उमेदवारांनी ग्रामीण विकास, शाश्वत शेती आणि दारिद्र्य कमी करण्यासाठी दृढ वचनबद्धता दाखवली पाहिजे. विविधता आणि समावेशः IFAD त्यांच्या संघांमधील भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधतेला महत्त्व देते आणि विविध पार्श्वभूमीतील अर्जदारांना प्रोत्साहन देते.

डुओलिंगो स्कॉलरशिपः भारतीय महिलांसाठी परदेशात उच्च शिक्षण घेण्याची संधी

अनेक भारतीय महिला परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न बघतात, पण त्यांच्यासाठी एक मोठी अडचण म्हणजे इंग्रजी भाषेत प्राविण्य मिळवणं, कारण बहुतेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये ही अट असते. आता डुओलिंगो (Duolingo) त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी मदत करतंय. लोकप्रिय डुओलिंगो इंग्लिश टेस्ट (DET) बनवणारी कंपनी 'डेटमined स्कॉलरशिप' (DETermined Scholarship) घेऊन आली आहे. हा एक खास उपक्रम आहे, ज्याद्वारे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय महिलांना पाठिंबा दिला जाणार आहे. ही स्कॉलरशिप केवळ खर्च भागवण्यासाठी नाही, तर सामाजिक अडथळे दर करण्यासाठी आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण घेण्याची इच्छा असूनही आर्थिक किंवा सामाजिक अडचणींमुळे ज्या महिला मागे राहतात, त्यांना या स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे.

परदेशात उच्च शिक्षण घेणं म्हणजे आयुष्यात मोठे बदल घडवणं, नवीन संधी मिळवणं आणि जागतिक स्तरावर संपर्क वाढवणं, पण अनेक भारतीय महिलांसाठी आर्थिक अडचणी किंवा संसाधनांची कमतरता यामुळे हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. डुओलिंगोची 'डेटमined स्कॉलरशिप' आर्थिक मदत आणि मार्गदर्शन देऊन ही दरी

भरून काढायला मदत करेल कोण अर्ज करू शकतं?

१. ज्या भारतीय महिला परदेशात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा विचार करत आहेत.

२. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी इंग्रजी प्राविण्य चाचणी (जसे की डुओलिंगो इंग्लिश टेस्ट) देणे आवश्यक आहे.

३. ज्यांचा शैक्षणिक record चांगला आहे, नेतृत्व क्षमता आहेत आणि भविष्यासाठी vision आहे.