INSPIRE उच्च शिक्षण शिष्यवृत्ती (SHE) 2025

2025-02-20

INSPIRE उच्च शिक्षण शिष्यवृत्ती (SHE) 2025: भारतातील विज्ञानप्रेमींसाठी संधी

भारतामधील अनेक प्रतिभावान तरुणांसाठी विज्ञानामध्ये उच्च शिक्षण घेणे हे एक स्वप्न असते, परंतु आर्थिक अडचणींमुळे हे स्वप्न पूर्ण करणे कठीण ठरते. हे लक्षात घेऊन, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (DST) त्यांच्या INSPIRE (Innovation in Science Pursuit for Inspired Research) कार्यक्रमांतर्गत INSPIRE उच्च शिक्षण शिष्यवृत्ती (SHE) सुरू केली आहे. या उपक्रमाचा उद्देश वैज्ञानिक प्रतिभेचा विकास करणे आणि विद्यार्थ्यांना मूलभूत व नैसर्गिक विज्ञान शाखांमध्ये करिअर घडवण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. जर तुम्हाला विज्ञानाची आवड असेल आणि संशोधन करण्याची इच्छा असेल, तर ही तुमच्या उज्ज्वल

भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.

INSPIRE SHE शिष्यवृत्ती म्हणजे काय? INSPIRE उच्च शिक्षण शिष्यवृत्ती (SHE) दरवर्षी १०,००० विद्यार्थ्यांना प्रदान केली जाते, जे विज्ञान संबंधित पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम करत असतात, या शिष्यवृत्तीचा उद्देश प्रतिभावान विद्यार्थ्यांना ओळखणे आणि त्यांना भारताच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीस मदत करण्यासाठी प्रेरित करणे आहे.

शिष्यवृत्तीचे फायदे

आर्थिक सहाय्यः निवड झालेल्या विद्यार्थ्यांना

दरवर्षी ८०,००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

मार्गदर्शन आणि संशोधन संधीः

शिष्यवृत्तीधारकांना संशोधन प्रकल्प, उन्हाळी कार्यक्रम, तसेच प्रमुख वैज्ञानिकांशी संवाद साधण्याची संधी मिळते.

उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहनः ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना M.Sc. आणि Ph.D. अभ्यासक्रमांकडे वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन करते.

कोण अर्ज करू शकतो?

INSPIRE SHE शिष्यवृत्ती साठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

भारतीय नागरिक असावा.

2024 मध्ये भारतातील मान्यताप्राप्त बोर्डामधून बारावी उत्तीर्ण असावा,

स्वतःच्या बोर्ड परीक्षेत टॉप १% मध्ये असावा.

B.Sc., B.S., Integrated M.Sc., किंवा Integrated M.S. मध्ये प्रवेश घेतलेला असावा (गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्र इत्यादी मूलभूत विज्ञान शाखांमध्ये).

ही संधी गमावू नका आजच अर्ज करा आणि विज्ञानामधील उज्ज्वल भविष्याकडे पाऊल टाका,