MAH CET 2025

2025-02-19

  

 

सध्या महाराष्ट्र टाईम्समध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. महाराष्ट्रातील विविध भागात काम केल्याने राज्यातील राजकीय, भौगोलिक, सांस्कृतिक बाबींचा चांगला अभ्यास. यापूर्वी सकाळ, लोकमत माध्यम समुहात काम केले. शैक्षणिक, व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यवहार विषयांची उत्तम जाण. डिजिटल माध्यमांत काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयांवर लिखाण केले. विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. उत्तम फिचर रायटर

" validation-title = "Enter Description">

MAH CET 2025: विधी अभ्यासक्रमाच्या 'सीईटी'च्या तारखेत बदल; मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेदिवशी पेपर आल्याने निर्णय

MAH CET login: सीईटी कक्षाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार या अभ्यासक्रमाची 'सीईटी' २० आणि २१ मार्च रोजी होणार होती. ती राज्यासह राज्याबाहेरील केंद्रांवर घेण्यात येते. मात्र, मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या सहाव्या सत्राची परीक्षा याच कालावधीत होणार आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठात सहाव्या सत्राला असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. याची दखल घेत सीईटी कक्षाने ही परीक्षा पुढे ढकलली आहे.

MAH CET Law 2025 exam Date : विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाची सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच 'सीईटी' आणि मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या सहाव्या सत्राची परीक्षा एकाच वेळी होणार असल्याने आता राज्य सीईटी कक्षाने 'सीईटी' परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी २०-२१ मार्च रोजी होणारी ही परीक्षा आता दीड महिना पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या तारखांनुसार ती ३ आणि ४ मे रोजी होणार आहे. यामुळे विद्यापीठाच्या सहाव्या सत्राला बसलेल्या आणि विधी अभ्यासक्रमात रस असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.

विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या 'सीईटी'च्या अर्जनोंदणीला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ८६ हजार ८५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ६५ हजार ९७ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्जनिश्चिती केली आहे, तर २१ हजार ७५९ विद्यार्थ्यांचे अर्जप्रक्रियेमध्ये आहेत. या परीक्षेला मिळणारा प्रतिसाद पाहता आणि अद्याप अर्जनिश्चितीची सुरू असलेली प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी सीईटी कक्षाने या अभ्यासक्रमाच्या 'सीईटी'च्या अर्जनोंदणीसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
सीईटी कक्षाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार या अभ्यासक्रमाची 'सीईटी' २० आणि २१ मार्च रोजी होणार होती. ती राज्यासह राज्याबाहेरील केंद्रांवर घेण्यात येते. मात्र, मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या सहाव्या सत्राची परीक्षा याच कालावधीत होणार आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठात सहाव्या सत्राला असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. याची दखल घेत सीईटी कक्षाने ही परीक्षा पुढे ढकलली आहे. अधिक विद्यार्थ्यांना अर्ज भरता यावेत, यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढही दिली आहे. त्यानंतर मुदत वाढवली जाणार नसल्याचे कक्षाने नमूद केले.
सीईटी सेल 
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्काचे नियमन) अधिनियम, २०१५ च्या कलम १० नुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाची स्थापना केली आहे. CET सेल भारतातील महाराष्ट्र राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विविध प्रवेश परीक्षा घेते. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, कृषी, कायदा, वैद्यकीय, आयुष आणि ललित कला यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुलभ करणे हा त्याचा प्राथमिक उद्देश आहे.

लेखकाबद्दल  

सध्या महाराष्ट्र टाईम्समध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. महाराष्ट्रातील विविध भागात काम केल्याने राज्यातील राजकीय, भौगोलिक, सांस्कृतिक बाबींचा चांगला अभ्यास. यापूर्वी सकाळ, लोकमत माध्यम समुहात काम केले. शैक्षणिक, व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यवहार विषयांची उत्तम जाण. डिजिटल माध्यमांत काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयांवर लिखाण केले. विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. उत्तम फिचर रायटर