ESIS Nagpur Recruitment 2025

2025-02-28

ESIS Nagpur Recruitment 2025: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत विविध पदांसाठी भरती, मुलाखतीतून होणार निवड

Nagpur ESIS Recruitment 2025: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२५' या भरतीतून एकूण १३ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीत भाग घेण्यासाठी ऑफलाइन अर्ज करावा लागणार आहे. या भरतीतून ऑर्थोपेडिक सर्जन, स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (ऑर्थो), स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (मेडिसिन), फिजिशियन, स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (पॅथॉलॉजी), स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (शस्त्रक्रिया), मेडिकल ऑफिसर ही पदे भरली जाणार आहेत.

ESIC Nagpur Bharti 2025 : नागपुरातील महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत विविध पदांसाठी भरती सुरू आहे. या भरतीतून ऑर्थोपेडिक सर्जन, स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (ऑर्थो), स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (मेडिसिन), फिजिशियन, स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (पॅथॉलॉजी), स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (शस्त्रक्रिया), मेडिकल ऑफिसर अशा पदांच्या १३ जागा भरल्या जाणार आहेत. इच्छूक उमेदवार या भरतीत भाग घेऊ शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीचे परिपत्रक व्यवस्थित वाचावे. या भरतीत भाग घेण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०२५ आहे. तर १७ आणि १८ मार्च २०२५ रोजी या भरतीसाठी मुलाखती होणार आहेत.

'महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, नागपूर भरती २०२५' या भरतीतून एकूण १३ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीत भाग घेण्यासाठी ऑफलाइन अर्ज करावा लागणार आहे. या भरतीतून ऑर्थोपेडिक सर्जन, स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (ऑर्थो), स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (मेडिसिन), फिजिशियन, स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (पॅथॉलॉजी), स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (शस्त्रक्रिया), मेडिकल ऑफिसर ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता 'एमबीबीएस, पीजी पदवी किंवा पीजी डिप्लोमासह एमबीबीएस' अशी आहे. निवड झाल्यानंतर नोकरीचे ठिकाण नागपूर असणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा रु. ७५०००/- ते रु. ८५६००/- पर्यंत वेतन मिळणार आहे. २७ फेब्रुवारी २०२५ पासून या भरतीसाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. तर १२ मार्च २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मुलाखत घेऊन पात्र उमेदवारांची निवड होणार आहे. १७, १८ मार्च रोजी या मुलाखती होणार आहेत.
१. अर्ज सादर करण्याचा पत्ता: वैद्यकीय अधीक्षक कार्यालय एमएच-एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स सोसायटी, हॉस्पिटल मानेवाडा रोड, सोमवारी पेठ, नागपूर – ४४००२४.
२. मुलाखतीची पत्ता: वैद्यकीय अधीक्षक कार्यालय एमएच-एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स सोसायटी, हॉस्पिटल मानेवाडा रोड, सोमवारी पेठ, नागपूर – ४४००२४.

  • एकूण रिक्त जागा - १३
  • अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाइन
  • नोकरीचे ठिकाण - नागपूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - १२ मार्च २०२५
  • मुलाखतीची तारीख - १७, १८ मार्च २०२५